श्री आनंद निरंजन आश्रम श्री शिवदत्तेश्वर मंदिर.

शिवद्त्तेश्वर आश्रम ,भारम रोड
ता. येवला जि. नाशिक
अंदरसूल

प. पू. श्री सद्गुरू आनंद निरंजन नाथ दत्त महाराज यांच्या कृपेने व प्रेरणेने अंदरसूल येथे आश्रमाची स्थापना सद्गुरूंच्या छायाचित्रासह दिनांक १०/०४/१९८६ ला झाली. अंदरसूल येथील भक्तजनांनी येथे नियमित सेवा चाले ठेवली आहे. श्रीगुरू परब्रम्हस्वरूप आहेत, त्यांची स्थापना अचलस्वरुपात करावी म्हणून येथे शिवलिंग स्थापिले आहे. श्री गुरु आनंद निरंजन नाथ दत्त महाराज यांची या लिंग स्वरुपात स्थापना माघ शु.१३ प्रदोष ,बुधवार दिनांक ११/०२/१९८७ रोजी दुपारी १ वा. १० मिनिटांनी शिवदत्तेश्वर नावाने केली गेली. जमिनीखाली व जमिनीवर असे शिवलिंग शाळुंकासाहित प्रमाणबद्ध करून तयार केलेले आहे.निर्णय सिंधू ग्रंथात त्रिविक्रम पद्धतीप्रमाणे लिंगाचे प्रमाण दिले आहे. त्या प्रमाणातील रेखाचित्र शिल्पश्स्त्रावरील “Album Of Hindu Iconography” या ग्रंथातील आहे. त्या प्रमाणे लिंग तयार केलेले आहे.लिंग प्रतिष्ठापनेचे विधान निर्णय सिंधू ग्रंथात दिल्याप्रमाणे प.पू.देवदत्तनाथ महाराज, श्री. अनंत पराशरे, व श्री .दिनानाथ नाडकर्णी यांनी मिळून तयार केले.
प्रतिष्ठापनेचा सोहळा तीन दिवस पर्यंत चालला. पूजेला स्वतः प.पू.देवदत्तनाथ महाराज बसले होते. नंतर महाशिवरात्रीस म्हणजे दि. २६/०२/१९८७ ला श्रीगुरू शिव-दत्तेश्वारास शतस्नान घातले. महाभिषेक स्नान १०८ औषधी वनस्पतींचे रस, काढे, गंध, आचमन, औक्षण, महाभिषेक स्नान व जलधारापात्र पूजन(१०६ धारांचे ) शत स्नानाच्या वनस्पती व वस्तू “ शातीकमलाकर ” ग्रंथाप्रमाणे सर्वांनी मिळून प्राप्त केल्या या दिवशी मध्यरात्री सर्वांना श्री गुरूंचे शिवद्त्तेश्वर स्वरुपात दर्शन झाले. दुसऱ्या वर्षी महाशिवरात्रीला दि . १६/०२/१९८८ ला शिवादात्तेश्वरास महारुद्राने (१३३१२ आवर्तने) अभिषेक करून हवन केले. सर्व काही भक्तजनांनी केले.
श्रीगुरूंची सेवा नियमितपणे दररोज खालीलप्रमाणे केली जाते :
सकाळी – भूपाळी, देवाजागृती , षोडशोपचार पूजा
दुपारी – पंचोपचार पूजा व आरती , प्रसाद
सायंकाळी ७.०० वा. पंचोपचार पूजा व आरती, प्रसाद.
रात्री १०.वा. प्रार्थना, देवाला शयन व प्रसाद.
२४ तास जलधारा व दीप हे चालू असते. दररोज क्रमाने एक भक्त सेवा करतो. पूजा पुराणोक्त मंत्रांनी करतो. नियमित पूजेशिवाय श्रीगुरू सयाजीनाथ माळी महाराज पुण्यतिथी, गुरुपोर्णिमा , श्रीगुरू नागेनाथ पुण्यतिथी, श्रीगुरू द्वादशी, गोरक्ष जयंती, दत्त जयंती, महाशिवरात्री, असे उत्सव उपासना सहित केले जाता. कशा साठीही वर्गणी देणगी घेतली जात नाही . सर्व भार सेवेकरी उचलतात.