श्री महाशाबरी शक्तीदेवी मंदिर

2
shri-1

अंदरसूल भारम गाव मार्ग ,
मु.पो.अंदरसूल,ता.येवला ,
जि.नाशिक(महाराष्ट्र)

|| अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त || श्री सद्गुरुनाथांचा विजय असो ! श्रीपरमपुरुष श्रीगुरुपरमेश्वराच्या कृपेने सकळ भक्तजनांच्या असीम त्यागातूनश्रीमहाशाबरी शक्तीदेवीमंदिरातील प्राण प्रतिष्ठापनेच सोहळा सोमवारी दि.२५/०२/२००२ रोजी झाली. मूर्ती प्रतिष्ठापना सकाळी ११.१५ या सुमुहूर्तावर झाली.मंदिरचा प्राणप्रतीष्ठापानेचा सोहळा ३ दिवस पर्यंत चालल. शिव आणि शक्ती यांचे एकत्र रूप म्हणजेच शाबरीमाता ही शाबरी देवी अष्टभुजा असून वाघावर विराजमान आहे.हा वाघ सोमनंदी म्हणजेच उमेचा नंदि आहे. देवीच्या सहा हातांमध्ये चक्र,खड्ग,धनुष्यबाण,शंख,गदा,त्रिशूल,रुद्राक्षमाला व कमलपूष्प(पद्म) धारण केलेले आहे. देवीच्या मस्तकावर चंद्रांकित किरीट असून त्यावर मोर व मत्स्य आहे. या देवीला षोडशी,त्रिपुरा,महात्रीपुर सुंदरी बाला,श्रीविद्या,भुवनेश्वरी असेही म्हणतात.
शाबरी माता मंदिर:
शाबरी मंदिरातील मुख्य आसन व इतर रचना हे देवी भागवतात मणीद्विपाचे म्हणजे देवी लोकाचे वर्णन केल्याप्रमाणे आहे.त्यात आसनाची उंची ५ फुट असून रुंदीपण ५ फुट आहे.त्यात लाल रंगाचा प्रवाळ प्राकार (तट,कोट) आहे. त्यावर सोनेरी रंगाचा नवरत्न प्राकार आहे.त्यात नवरत्ने जडवलेली आहे. या आसना खली षटकोनी यंत्र अहर,त्याला महामकरत प्राकार म्हणतात .त्याचा रंग पोपटी आहे.(मकरत म्हणजे पन्नारत्न) षटकोनाखाली अष्टदलकमल आहे. हे मोत्याच्या रंगाचे आहे.त्याला मुक्ता प्राकार म्हणतात.त्या खाली इंद्रनील प्राकार आहे. गर्भ मंदिराच्या तीन पायर्यांपैकी वरती वैडूर्य प्राकार , नंतर हीरक प्राकार व खाली गोमेद प्राकार आहे. पायर्यांच्या खाली पद्म प्राकार आहे त्याचा रंग लाल आहे.
प्रदक्षिणा मार्गात शबरी कवचात उल्लेखित असलेल्या क्रमाने देवतांची छोटी छोटी ७२ मंदिरे आहेत.प्रदक्षिणा क्रमाने हे वाचल्यास शबरी कवचाचे एक आवर्तन पूर्ण होते. अशी ही मंदिराची रचना आहे. शाबरी मातेचे मंदिर हे प.पू. अण्णांच्या साधनेतील अनुभूतीतून अथक परिश्रमातून आकारास आले आहे.त्यात काटेकोरपणे वेद्शास्त्राचा आधार घेतला आहे. हे अलौकिक, दुर्मिळ व दुर्लभ कार्य केवळ त्यांच्या प्रेरणेतून भक्तांना करता आले.
श्रीमहाशाबरी शक्तीदेवी मंदिरातील होणारे दैनंदिन कार्यक्रम खालीलप्रमाणे :
काकड आरती – सकाळी ५ वा.
षोडशोपचार पूजा – सकाळी ५.३० ते ७.३०
पंचोपचार पूजा व आरती प्रसाद – दुपारी १२ वा.
पंचोपचार पूजा व आरती प्रसाद – ६.४५ वा.
शयन आरती – रात्री ९ वा.
इतर कार्यक्रम :
दर गुरुवारी रात्री ८.३० वा. भजन होते. तर महिन्यातील प्रत्येक भागवत एकादशीस भजन व हरिपाठ होतो.आणि नवरात्रीच्या उत्सवादरम्यान नऊ रात्रिंपैकी एका रात्री जागरण व भजन.