|| अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त || श्री सद्गुरूनाथ महाराज कि जय ||

|| श्री ||

श्री सद्गुरू अध्यात्म ज्ञानपीठाचे मार्गदर्शक व आमचे सद्गुरू अण्णा हे, साक्षात्कारी, आध्यात्म संपन्न, त्रिकाळ ज्ञानी, परम सात्विक,अचूक मार्गदर्शक,सर्वांना समान मानणारे, निःस्वार्थी , परोपकारी, अभ्यासू,सिद्धहस्त लेखक,कवी,भक्तिपंथ वाढविणारे, ईशकार्यात गढलेले, प्रसिद्धी पासून दूर राहणारे, एकांतप्रिय,असे व्यक्तिमत्त्व आहे. अण्णांचे पूर्ण नाव श्री दीपक मुरलीधर माळी असे आहे. त्यांचे अध्यात्मिक क्षेत्रातील नाव देवदत्त हे आहे. परिचित लोक त्यांना अण्णा म्हणतात. नौकरीच्या जीवनात ते माळी साहेब म्हणून ओळखले जातात. म्हणून दीपक, देवदत्त, अण्णा , माळीसाहेब हि सर्व एकाच व्यक्तीची म्हणजे प.पू.अण्णांचीच आहेत.

अण्णांचे वडील श्री मुरलीधर हरी माळी हे बरीच वर्षे पुणे येथे वास्तव्यास होते.ते श्रीगुरु आनंद निरंजनना थमहाराज म्हणजेचपू.बापूसाहेब मिटकर महाराज यांचे भक्त होते. त्यांच्या कृपेने अण्णांचा जन्म ३१ जानेवारी १९५२ रोजी पुणे येथे झाला. त्या दिवशी माघ शुद्ध पंचमी म्हणजे वसंत पंचमी होती. व गुरुवार होता. जन्मानंतर दोन वर्षे अण्णा फक्त आकाशाकडे नजर लावूनच जगले.हालचाल नाही कि खाणेपिणे नाही प्रकृती क्षीण होत गेली व दोन वर्षांनी ई.स.१९५४ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. होय खरोखर मृत्यु झाला. पण श्रीगुरू आनंद निरांजननाथ महाराजांनी प्रेताकडे पाहत खळाळून हसून ते प्रेत जिवंत केले.हि कथा नाही.प्रत्यक्ष घडलेली घटना आहे. अण्णा पुन्हा जिवंत झाले.गुरुदेवांनी हा प्रसाद दिला म्हणून त्यांचे नाव देवदत्त असे झाले. देवदत्त या शब्दाचा अर्थ देवाने दिलेले असा आहे. देवाने दिलेला प्रसाद म्हणून देवदत्त हे नाव आहे. श्रीगुरुंनी अण्णांना जिवंत केल्यावरही यमदुतांनी पाठलाग सोडला नाही.पुन्हा फास अडकविण्याचा प्रयत्न केला. पान गुरूः साक्षात परब्रम्ह, त्यांनी यमपाश विफल केला. हा श्रीगुरूंचा महिमा आहे.त्याला या जगात तोड नाही. यमपाश विफल केल्यानंतर श्रीगुरुंनी अण्णांच्या वडिलांना सांगितले, ‘ तुम्ही या मुलाला घेऊन तुमच्या मूळ गावी अंदरसूल येथे जावेव तेथेच राहावे. पुयात राहू नये !’ ‘श्रीगुरुंचे शब्द म्हणजे ब्रम्हवाक्य !’ त्यांच्या वडिलांनी पालन केले व लोकनिन्देची परवा न करता पुण्यातील संपत्ती पुण्यातच सोडून ते अंदरसूल येथे आले व स्थायिक झाले. अंदरसूल हे गाव नाशिक जिल्ह्याच्या पूर्व सरहद्दीवर येवले तालुक्यात आहे.आज जेथे आनंद निरंजन आश्रम आहे , त्याच्या पासून थोड्या अंतरावर हे कुटुंब शेती व्यवसाय करीत होते.तेथेच अण्णांचे बालपण गेले व शालेय शिक्षण झाले.

त्यांच्या गूढ ज्ञानाचा ठाव लागणे केवळ अशक्य.एवढे असूनही ते सामान्य प्रमाणे वावरतात.सामान्य राहणी आहे, पण अंतरंग दिव्य आहे. प्रसिद्धीपासून दूर राहूनही जगाविषयी अपार करूणा त्यांना आहे.प्रसंगोपात्त हजारो लोकांना त्यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.त्यामुळे ते लोक समस्या संकट, इ. पासून मुक्त होऊन भक्ती मार्गात क्रमणा करीत आहेत.कुणाच्याही पैशांना स्पर्श न करणारा हा संत पाहून अनेकांना आश्चर्य वाटते.पान ती वस्तुस्थिती आहे. ‘ ऐशी कळवळ्याची जाती | करी लाभाविण प्रीती ||’ हि संतोक्ती इथे लागू पडते.सर्वांचा ऐहिक व पारमार्थिक उत्कर्ष व्हावा म्हणून त्यांनी देह झिजविला आहे.

लहानपणीच त्यांनी धार्मिक ग्रंथांचे वाचन सुरु केले.नामस्मरण, अनुष्ठान, पारायण पूजा इ. देखील बालपणापासून सुरु केले. ते अजूनही चालू आहे. अण्णांनी एम. ए. एल. एल. बी. पर्यंत शिक्षण पूर्ण केले.पण ते या शिक्षणासाठी कधीही महाविद्यालयात गेले नाही. स्वतःच अत्यंत काटेकोरपणे पण कमी वेळात स्वतः अभ्यास करूनच शिक्षण पूर्ण केले. आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. श्रीगुरूंची हि कृपाआहे असे अण्णा म्हणतात. लहानपणपासून त्यांनी सतत उपासना केली. त्या कष्टांना तोड नाही . श्रीगुरू आनंद निरंजन महाराज यांना परमेश्वर मानून त्यांनी उपासना केली.वयाच्या केवळ तेराव्या वर्षी म्हणजे १९६५ मध्ये श्रीपाद श्रीवल्लभ अर्थात श्री दत्तप्रभूंनी औदुंबर वृक्षाखाली प्रत्यक्ष प्रगत होऊन बराच वेळ दर्शन दिले व मंत्रोपदेश केला. त्यावेळी अण्णा श्रीगुरू चरित्राचे पारायण करीत होते.नंतरच्या काळात अण्णांना प्रभू दत्तात्रेयांनी विरत व सूक्ष्म, एक व अनेक अशा अनंत स्वरुपात दर्शन दिले. या क्षणापासून अण्णा परमेश्वर स्वरूप झाले असे भाक्तजनांना अनुभवास येऊ लागले.

त्यांचे नोकरीतील जीवन हे निष्कलंक आहे. एवढेच नव्हे तर तर ते पूर्ण पवित्र आहे. नोकरीत भरपूर काम, वक्तशीरपणा , इतरांना कामात मदत करणे, सतत हसतमुख, अपशब्द नाही ,कुणाशी शत्रुत्व, भांडण नाही. पगाराची चौकशी नाही. बढती, बदलीसाठी विनंती नाही. त्यांच्याविषयी नौकरीच्या ठिकाणचे कर्मचारी आदरच व्यक्त करतील.असे त्यांचे पवित्र जीवन नौकरीत आहे.
लोक संसारात जे दु:ख भोगतात त्याच्या निवारणासाठी त्यांनी ‘सुखाची वाट ‘ हे पुस्तक तयार करून त्याचे विनामूल्य वाटप केले, धार्मिक संस्कारासाठी ‘सुलभ धर्माचरण’ हे पुस्तक तयार केले. (१) साधुदेव मामलेदार अर्थात यशवंतराव महाराज यांचे चरित्र (२)साधुदेवमामलेदारसंक्षिप्त चरित्र(३)मधुकर महाराज पेडणेकर चरित्र (४) सातम महाराज संक्षिप्त चरित्र (५)माधवनाथ जीवन तुषार (६) श्रीभागवत महात्म्य गद्य भाषांतर.हे त्यांचे मराठी गद्य साहित्य आहे.
(१) श्रीसद्गुरु एकदाशोत्तर शत नामावली (२) श्रीगुरुगीतंशावगुंठीत सद्गुरू सहस्त्र नामावली (३) श्री रंगावधुत अष्टोत्तरशतनामावली (४) सुलभ अष्टाध्यायी रुद्र (५) हवनासाठी रुद्राध्याय . हे संस्कृत साहित्य आहे. (१) श्रीगुरू चारीत्रांतर्गत श्रीगुरू स्तुतीचे संपादन (२)श्री सयाजीनाथ चरित्र(३)श्री मारुतीनाथ चरित्र (४) श्री आनंद नाथ चरित्र (५) श्री भागवत महात्म्य . हे मराठी ओवीबद्ध काव्यग्रंथ आहेत. अण्णांचे तत्वज्ञान व जीवन मार्ग “ श्रीदत्त हरिपाठ” या बहुमोल रचनेत व्यक्त झाले आहेत . हा श्री दत्त हरिपाठ अवश्य वाचवा व अभ्यासावा.

अण्णा ज्ञानचक्षु त्रैमासिकात लिहितात ते संपादकीय व विविध विषयांवरील अनेक अभ्यासपूर्ण लेख हे भक्तीमार्गातील कोणत्याही साधकाला अचूक मार्गदर्शनपर ठरावेत असे आहेत.हे ज्ञ्न्चाक्षु त्रैमासिक देखील अण्णांनीच २९ वर्षांपूर्वी सुरु केले व याचे वितरण देखील त्यांनी विनामूल्य ठेवलेले आहे. ‘ हा ज्ञानदिप दुसर्याच्या हाती दे’ एवढेच मूल्य ते मागतात व ‘ह्या ज्ञानदीपाने लाखो जीवने प्रकाशित व्हावीत’ हीच अण्णांची इच्छा आहे.