|| श्रीगुरुदेवदत्त ||

एक मात्र परमेश्वरच अखिल विश्वाचा कर्ता, धर्ता, हर्ता, व कल्याण कर्ता आहे. त्याने पुराण ग्रंथात सांगितलेल्या मार्गांचे आचरण केल्यास सर्वांचे शाश्वत कल्याण होते. भारतीय पुराण ग्रंथातील धर्माचरण हे समृद्धी, सहिष्णुता, आरोग्य, कृतज्ञता, भक्ती व कर्तव्य बुद्धी वाढविणारे असल्याने ते नेहमी ग्राह्य आहे.

सद्गुरू आध्यात्म ज्ञानपीठ हे प.पू. आण्णांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झाले आहे. त्यातून सर्वसामान्य माणसाला शास्रोक्त पण सोप्या पद्धतीने देवपूजा, धर्माचरण करता यावे यासाठी विविध पुस्तके तयार करण्यात आली आहेत. सद्गुरू आध्यात्म ज्ञानपीठ द्वारा प्रकाशित ‘ सुलभ धर्माचरण ’ यातनित्य कर्मांचा लोप होऊ नये यासाठी सुलभ, आटोपशीर व सुटसुटीत असे कर्म विधान आहेत . विस्तार भयाने कर्म लोप करून संस्कारहीन होण्यापेक्षा संक्षिप्त कर्म करून संस्कार कायम ठेवणे हे व्यक्ती ,कुटुंब, समाज व राष्ट्र यांना हितावह आहे हि नम्र भूमिका यात आहे.

अशाच प्रकारचे अनेक धार्मिक विधींची पुस्तके , स्तोत्रे प्रकाशित केली गेली आहेत. तसेच सद्गुरू आध्यात्म ज्ञानपीठाद्वारा स्थापन केलेल्या मंदिरांची माहिती, फोटो, यांचा समावेश या संकेतस्थळात दिलेला आहे. या ज्ञानदिपाने लाखो जीवाने प्रकाशित व्हावीत याच एकमात्र उद्देशाने या संकेतस्थळाची निर्मिती करण्याच निर्णय झाला. हा अमूल्य ठेवा प्रत्येकाला प्राप्त व्हावा यासाठी आपण प्रयत्न करूया

ओम शांतिः शांतिः शांतिः