श्री वृध्दनृसिंह सरस्वती(श्री स्वामी समर्थ) दत्तात्रेय मंदिर

|| श्री ||
श्री वृध्दनृसिंह सरस्वती(श्री स्वामी समर्थ) दत्तात्रेय मंदिर,
घर नं.५९५/९६,गाडगीळ लेन,रविवार पेठ,नाशिक.

|| अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त || श्री सद्गुरुनाथांचा विजय असो !श्री वृध्दनृसिंह सरस्वती(श्री स्वामी समर्थ) हा श्रीगुरू दत्तात्रेयांचा तिसरा अवतार होय. नृसिंह सरस्वती कर्दळी वनात तपश्चर्येला बसले व ३०० वर्षांनी समाधी त्यागून ते ज्या अवतारात प्रकट झाले तोच अवतार श्री वृध्दनृसिंह सरस्वती म्हणजेच श्री स्वामी समर्थहोय.
श्रीपरमपुरुष श्रीगुरुपरमेश्वराच्या कृपेने सकाळ भक्तजनांच्या असीम त्यागातून श्री वृध्दनृसिंह सरस्वती(श्री स्वामी समर्थ) दत्तात्रेयमंदिरातील प्राण प्रतिष्ठापनेच सोहळा दि.०१/०३/२०१२,गुरुवारी पार पडला.मूर्ती प्रतिष्ठापना दुपारी ११.५५ या सुमुहूर्तावर तर कलशारोपण दुपारी १२.३५ या सुमुहूर्तावर झाले.मंदिरचा प्राणप्रतीष्ठापानेचा सोहळा ३ दिवस पर्यंत चालला.
श्री वृध्दनृसिंह सरस्वती(श्री स्वामी समर्थ) दत्तात्रेय मंदिरात होणारे दैनंदिन कार्यक्रम खालीलप्रमाणे :
काकड आरती – सकाळी ५ वा.
षोडशोपचार पूजा – सकाळी ५.३० ते ७.३०
पंचोपचार पूजा व आरती प्रसाद – दुपारी १२ वा.
पंचोपचार पूजा व आरती प्रसाद – ६.४५ वा.
शयन आरती – रात्री ९ वा.
इतर कार्यक्रम :
दर गुरुवारी रात्री दत्त स्तुती गायली जाते. तर महिन्यातील प्रत्येक भागवत एकादशीस भजन व हरिपाठ होतो.