श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रेय मंदिर

|| श्री ||
श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रेय मंदिर
नाशिक-औरंगाबाद महामार्ग,
मु.पो.माडसांगावी, ता.जि.नाशिक

|| अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त || श्री सद्गुरुनाथांचा विजय असो! श्रीपरमपुरुष श्रीगुरुपरमेश्वराच्या कृपेने सकाळ भक्तजनांच्या असीम त्यागातून भगवान् श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रेय मंदिराचे निर्माण काम दि. २४/५/२०१०,सोमवारीपूर्ण झाले. मूर्ती प्रतिष्ठापना व कळस दुपारी २.०० च्या सुमुहूर्तावर बसविण्यात आले. मंदिरचा प्राणप्रतीष्ठापानेचा सोहळा ५ दिवस पर्यंत चालला.
श्रीपाद श्रीवल्लभ चरीतामृतानुसार कलियुगात श्रीपाद श्रीवल्लभ अवतार हा श्रीदत्त प्रभूंचा प्रथम अवतार किंवा आद्य अवतार होय.त्यांचा अवतार पूर्व गोदावरी जिल्ह्यातील पिठीकापुरम (पिठापूर) येथे भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी ख्रिस्त शके १३२०,कृष्ण-यजुर्वेद शाखा , आपस्तंभ सूत्र , भारद्वाज गोत्रात ब्र्म्हश्री घंडीकोटा अप्प्लराज शर्मा आणि अखंड लक्ष्मी सौभाग्यवती सुमती महाराणी यांचे तृतीय संतान म्हणून झाला. श्रीपाद श्रीवल्लभांना श्रीधरराज शर्मा व रामराज शर्मा हे दोघे भाऊ आणि श्रीविद्याधरी, राधा आणि सुरेखा या तीन बहिणी होत्या. ब्रह्मश्री मल्लादी बाप्पन्नावधानुलू आणि अखंड लक्ष्मी सौभाग्यवती राजमांबा हे मातामह-मातामही होत.
श्रीपाद श्रीवाल्लाभांनी पिठापूर येथे १६ वर्षे तर कुरवपुरात १४ वर्षे अशा अवघ्या ३० वर्षाच्या कालावधीत अदभूत असे लीला चरित्र दाखवून स्वभाक्तांना इह-परलोकातील शाश्वत सुख प्रदान केले. श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रेय मंदिरात श्रीपाद श्रीवल्लाभांची अत्यंत सुंदर व नयनमनोहारी मूर्ती आहे. मंदिरात विजया दशमी (२०११) पासून अन्नदान सुरु केले आहे.आठवड्यातील वार काही सेवेकरी भक्तांना ठरवून दिलेले आहेत त्याप्रमाणे ते अन्नदानाचे कार्य करतात.
श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रेय मंदिरात होणारे दैनंदिन कार्यक्रम खालीलप्रमाणे :
काकड आरती – सकाळी ५ वा.
षोडशोपचार पूजा – सकाळी ५.३० ते ७.३०
पंचोपचार पूजा व आरती प्रसाद – दुपारी १२ वा.
अन्नदान – दुपारी ३ वा.पर्यंत
पंचोपचार पूजा व आरती प्रसाद– ६.४५ वा.
शयन आरती – रात्री ९ वा.
इतर कार्यक्रम :
दर गुरुवारी रात्री ८.३० वा. भजन होते. तर महिन्यातील प्रत्येक भागवत एकादशीस भजन व हरिपाठ होतो. उत्सवाच्या दिवशी ,पारायण काळात व अधिक मासात अखंड वीणा चालू असतो. याव्यतिरिक्त मंदीरात गुरुप्रतीपदा, गुरुपोर्णिमा, गुरुद्वादशी, दत्त जयंती व चैत्र वद्य १३.(अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी) या पाच उत्सावांनिमित्त सप्ताह पारायण होतात.